कंटेनर कारचा भीषण अपघात; कार मधील दोन तरुण जागीच ठार

Foto

औरंगाबाद- भरधाव कंटेनर आणि कार च्या भीषण अपघातात कार मधील दोन तरुणाचा चेंदामेंदा झाला.दोघेही जागीच ठार झाल्याची घटना आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास औरंगाबाद नाशिक रस्त्यावरील  माळीवाडा जवळ येथे घडला.अपघाता नंतर कंटेनर चा चालक पसार झाला पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


पराग रामचंद्र कुलकर्णी वय 32 वर्ष(रा.तारांगण,कासलीवाल, पाडेगाव), अरुण छगन काकडे वय26 वर्षे(रा.नारेगावा, औरंगाबाद) असे अपघातात ठार झालेल्या दोन्ही तरुणांची नावे आहेत. या अपघात बाबत अधिक माहिती अशी की, पराग हा  मूळचा नाशिक येथील रहिवासी होता.नोकरी निमित्त तो मागील काही वर्षांपासून शहराजवळील तारांगण सोसायटीत राहत होता. तो बजाज कंपनीत कामाला होता. पराग हा मित्रा अरुण व सहकाऱ्या सोबत कामानिमित्त (एम एच 23 ए डी1654) या कार मधून बाहेरगावी गेला होता. काम आटोपल्यावर  आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घरी येत असताना औरंगाबाद नाशिक रोडवरील  दौलताबाद टी पॉईंट ते माळीवाडा  दरम्यान भरधाव आलेल्या (एम एल01 ए सी 0605) कंटेनर  व कार चा अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की, संपूर्ण कार कंटेनर खाली चुराडा झाली व कार मध्ये असलेल्या पराग आणि अरुण याचा चेंदामेंदा झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनला पाचारण करीत कंटेनर खालील कार बाहेर काढत दोघांनाही रुग्णवाहिकेद्वारर घाटी रुग्णालयात हलविले मात्र डॉक्टरांनी तपासून दोघानाही मृत घोषित केले. अपघाता नंतर कंटेनर चा चालक पसार झाला आहे. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने जप्त केली आहे. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस फरार कंटेनर चालकांचा शोध घेत आहेत..